*आज प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखक मा.बाबा कदम यांची जयंती.* जन्म. ४ मे १९२९ सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे मा.बाबा कदम यांचे खरे नाव वीरसेन आनंद कदम होते. त्यांचे वडिल अक्कासाहेब महाराजांचे स्वीय सचिव होते. संस्थांनी वातावरणातच बाबांचे बालपण गेले. त्यांचे वडिल रेसकोर्सवर अधिकारी म्हणूनही कार्यरत असत. त्याचाच परिणाम बाबांच्या कथालेखनात झाला. त्यांच्या कथा , कादंबर्यानत मात्र ऐतिहासिक पार्श्वभूमी , संस्थानिक गढ्या , वाडे , सरंजामी सदर बोली भाषा , पोलीस , कायदा , कोर्ट , रेसकोर्स इ. हमखास असे. त्यांची ` अजिंक्यतारा ' कथा रेसकोर्सच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या बालपणातच वडिलांचे निधन झाले. प्राथमिक शिक्षण वसतिगृहात राहून झाले. स्वावलंबी जीवनाचे धडे त्यांनी आश्रमातच घेतले. इथेच त्यांची चित्रकलेशी ओळख झाली. पुढे ते राजाराम कॉलेजमधून पदवीधर झाले. याच काळात बाळ गजबरांचाही परिचय झाल्याने चित्रकलेचे संस्कार त्यांच्यावर झाले. घरच्या परिस्थितीमुळे पुढे त्यांनी एस. टी. महामंडळात काही काळ सेवाही करतानाच शिक्षणाची ओढ त्यांना गप्प बसू देत नव्हती. ते १९५४ मध्ये एल.एल.बी.झाले....