आज ब्रायन चार्ल्स लाराचा वाढदिवस
आज २ मे
आज ब्रायन चार्ल्स लाराचा वाढदिवस
जन्म २ मे १९६९
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होईल अशा ब्रायन लाराची खासियत आहे. ब्रायन चार्ल्स लारा नावाचा फलंदाज अद्वितीय होता. डावखुऱ्या फलंदाजीच्या बाबतीत तर तो त्याची पावलं सर गारफिल्ड सोबर्स आणि ग्रॅहम पोलॉकच्या पावलाशी जुळवतच खेळला. लारा हा ब्रॅडमनप्रमाणे मोठ्या खेळी भन्नाट वेगात आणि असामान्य शैलीने उभारायचा. तो असे काही फटके खेळायचा जे सामान्य माणसाच्या कल्पनाशक्तीपलिकडचे असायचे. काही वेळा त्याच्या फटक्याचा ओघ पाहून नायगारा किंवा व्हिक्टोरिया फॉल्सलाही हेवा वाटला असता.
ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेट लेखक जॅक फिंगलटन नेहमी म्हणायचा, "High Backlift and flourishing follow through is the hallmark of great batsman". लारा ही व्याख्या जगतो असं वाटयचं.'
पण तो एका क्षणी अशी झेप घ्यायचा की गरूड वाटायचा. तर दुसऱ्या क्षणी त्याच्या पंखात घारीचीही ताकद नसायची. हा लाराच्या कारकिर्दीतला मोठा विरोधाभास होता. प्रत्येक गरूडभरारीनंतरचे पाय जमिनीवर ठेवायला त्याला जमलंच नाही. तिथंच त्याचं जिनिअस दुषित व्हायचं. लौकिकाचा मुकुट त्याला सांभाळायला जमलं नाही.
वयाच्या २४व्या वर्षी त्याने सोबर्सचा तो विक्रम मोडला (नाबाद ३६५) जो मोडला जाईल असं सोबर्सलाही वाटलं नव्हतं. त्यानंतर त्याने काही महिन्यात डरहॅम कौंटी विरूद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमधला पाकिस्तानच्या हानिफ महम्मदचा (४९९) धावांचा विक्रम मोडला आणि ५०५ धावा केल्या. आणि हे सर्व २४ व्या वर्षी. वेस्ट इंडीयन संस्कृतीत वाढलेले लाराचे पाय जमिनीवर कसे राहतील? त्याचे क्रिकेट परिपक्व होते. त्या क्रिकेटचे केस पिकलेले होते. शरीर आणि मन तरूण होतं. फक्त २४ वर्षांचं मन बेधुंद झालं, लगाम सुटलेल्या घोड्यासारखं.
विंडीजचे पुर्वीचे महान खेळाडू काही संत नव्हते. त्यांनीही कधी तारूण्यातील लीलांशी तडजोड केली नाही. पण लाराचं दुसरं दुर्दैव असं होतं की, तो विंडीजच्या संघामधील एकटाच स्वयंप्रकाशी सूर्य होता. बाकीचे सर्व परग्रह होते... आणि काळ होता वाढलेल्या प्रसिद्धीमाध्यमांचा. लाराची प्रत्येक हालचाल ही प्रकाशझोतात येत होती. त्याच्या काळी ब्रॅडमनही विचित्र वागलाय पण आजच्यासारखी प्रसिद्धीची साधने तेव्हा नव्हती. याचा परिणाम लाराच्या फलंदाजीवर झाला. मुलतः तो अशा उंचीवर होता की जिथून फक्त कोसळणं शक्य होतं. तो कोसळत गेला. इतका की त्याची कसोटी सरासरी जी ५५ च्या घरात होती ती ४७ च्या घरात आली. पण त्या काळातही त्याच्या जिनिअसचा लखलखाट मध्येच डोळे दिपवून जायचा. पण पुन्हा जेव्हा भरती आली तेव्हा मुरलीधरन सारख्या जगातल्या सर्वोत्कृष्ट ऑफस्पिनरविरूद्ध त्याने श्रीलंकेमध्ये फिरणाऱ्या खेळपट्टीवर ६०० च्या वर धावा केल्या. लाराला गोलंदाजी टाकताना मुरलीधरन सामान्यच गोलंदाज वाटायचा, पण तो दुसऱ्या वेस्टइंडीयन फलंदाजांना गोलंदाजी टाकताना परग्रहावरून आल्यासारखा वाटायचा. त्याचा ३०५ नाबाद धावांचा विक्रम जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या हेडनने खेचून घेतला त्यावेळी तो पुन्हा आपल्याकडे हिसकावून घेताना त्याने षटकार ठोकलाच पण अद्वितीय अशा ४०० नाबाद धावा केल्या. ही गोष्ट त्याला क्रिकेटच्या क्षितीजावरचा ध्रुवतारा ठरवते. कारकीर्दीत भरती-ओहोटीतून जाताना लाराने आपली फलंदाजी कधीच बदलली नाही. त्याने मोठे स्कोअर्स केले ते शहेनशहाच्या थाटात. विकेट दिली तीसुद्धा शहेनशहसारखी. त्याची कायम हीच शाही प्रतिमा माझ्या मनात आहे.
मा.द्वारकानाथ संझगिरी आपल्या लेखात म्हणतात. "लाराची फलंदाजी म्हणजे दुथडी भरून वाहणारी नदी..उंच कड्यावरून कोसळणारा धबधबा"
हा फलंदाज मला सचिनपेक्षा कणभर श्रेष्ठच वाटत आलाय..पण त्याच्या श्रेष्ठत्वाला असातत्याचा शाप कायमचाच भोवला आणि हा महान फलंदाज अपयशाच्या गर्तेत आपसूकच गोवला..आणि महत्वाचं,त्याच्या सारखा नटराज शॉट आजही कोणीच मारत नाही. ब्रायन लाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / द्वारकानाथ संझगिरी

Comments