आज ४ मे आज मा. बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबला वादक मा.किशन महाराज यांची पुण्यतिथी.
*आज मा. बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबला वादक मा.किशन महाराज यांची पुण्यतिथी.*
जन्म . ३ सप्टेंबर १९२३
वयाच्या ११ व्या
वर्षीपासून मा.किशन महाराज यांनी तबलावादनास सुरुवात केली. ते बनारस घराण्याशी संबंधित होते.
त्यांचे वडील पंडित हरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तबलावादनाचे धडे
घेतले. वडिलांच्या निधनानंतर त्यांचे काका पं. कांथे महाराज, पं. बलदेव सहाय यांचे शिष्यत्व त्यांनी
स्वीकारले. आपल्या काळातील सर्व तबलावादकांना मागे टाकीत त्यांनी या कलेत
प्राविण्य मिळविले. असंख्य संगीत संमेलने गाजविल्यानंतर त्यांनी देश-विदेशातही
तबलावादनाचे स्वतंत्र कार्यक्रम केले. कोणत्याही वाद्यासोबत ते जुगलबंदीसाठी तयार
असत. मा.किशन महाराज बनारस घराण्याच्या कंठे महाराजांचे शिष्य होते. त्यांच्या
योगदाना बद्दल भारत सरकारने त्यांना १९७३ साली पद्मश्री आणि त्यानंतर २००२ साली
त्यांना पद्मविभूषण देऊन गौरविण्यात आले होते. त्यांना काशी विद्यापीठ आणि रवींद्र
विद्यापीठातर्फे डॉक्टरेट ही उपाधीही देण्यात आली होती. मा.किशन महाराज यांचे चिरजीव पुरन महाराज हेही तबलावादन करतात. *मा.किशन महाराज* यांचे ४ मे २००८ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे. मा.किशन महाराज यांना आदरांजली.
*संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Comments